सोहळा
हार तुरे बांधा, रांगोळया काढा,
आपुल्या भेटीसाठी काहीतरी जल्लोष करावा.
खूप दिवस झाले भेटून याचा आहे FB वर पुरावा,
Whatsapp मुळे म्हणे कमी झाला आहे Timezoneचा दुरावा.
तुझ्या घरच्यांसाठी Chocolate चा डब्बा, तुझ्या चिमुरडीसाठी खाऊ-खेळणी घेतली आहेत आवर्जून.
पण तुझ्यासाठी सखे काय आणू ह्या 23kgच्या मर्यादेत बांधून?
‘दिवसभर’, ‘Dinner ला’ म्हणता म्हणता भागते Coffee वरच तहान,
वर्षाचे प्रगतीपुसतक मांडताना हरवून जाते भान.
3.30 च्या बसमधील गणवेषातील हसणार्या कारट्या,
विशीतल्या त्या बेधूंद तरुणींच्या पारट्या.
आठवणींचा पाढा म्हणताना होतो कंठ हळवा,
दोन तासांच्या भेटीत साजरा होतो जीवाभावाचा सोहळा.