एक झाड
एक झाड असाव,
खिडकीच्या बाहेर बहरणार
एक झाड असाव.
नारंगी शालू नेसून भर उन्हाळ्यात
मिरवणाऱ्या गुलमोहोराकडे
डोळे भरून नाहाळाव.
पावसाळ्यात कडक चहा पिताना
त्याला मिसकीलपणे चिडवाव.
एक झाड असाव,
खिडकीच्या बाहेर,
एक झाड असाव.
हिरव्या-पिवळ्या काठपदराच्या
सडपातळ चेरीचे पानगळतीत
मन जाणून घ्याव.
हिवाळ्यात जन्माजन्मांचे वादे नकोत
र्वतमानात जगण्याचे धैर्य द्याव.
एक झाड असाव,
लेकी-नातींच्या विश्वाच्या पलीकडे,
खिडकीच्या बाहेर बहरणार.