ते काय म्हणाले
कुणी म्हणाले, हे ग्रंथ पवित्र आहेत
कुणी म्हणाले, छे! खरे तर त्या शब्दांत ताकद आहे.
कुणी ओरडले, हे तर साक्षात महात्मा.
कुणी ओरडले, छे! उपवास करूनच सापडले परमात्मा.
कुणी म्हणाले, ही भूमी आपली जननी.
कुणी म्हणाले, छे! हो… खरे तर मातापित्यांच्या जावे शरणी.
कुणी प्रचाराच्या बाजारात झुंजले का?
कुणी भुकंपाच्या कोपात भाजले का?
दहशताची ठेच कुणी ऐकली का?
भुकेची तळमळ कुणी जाणली का?
आणी मी…मी काय म्हणार?
मला? मला असेच राहुद्या….