एक झाड

एक झाड असाव,खिडकीच्या बाहेर बहरणारएक झाड असाव. नारंगी शालू नेसून भर उन्हाळ्यातमिरवणाऱ्या गुलमोहोराकडेडोळे भरून नाहाळाव.पावसाळ्यात कडक चहा पितानात्याला मिसकीलपणे चिडवाव. एक झाड असाव,खिडकीच्या बाहेर,एक झाड असाव. हिरव्या-पिवळ्या काठपदराच्यासडपातळ चेरीचे पानगळतीतमन जाणून घ्याव.हिवाळ्यात जन्माजन्मांचे वादे नकोतर्वतमानात जगण्याचे धैर्य द्याव. एक झाड असाव,लेकी-नातींच्या विश्वाच्या पलीकडे,खिडकीच्या बाहेर बहरणार.

Read More →