ते काय म्हणाले

कुणी म्हणाले, हे ग्रंथ पवित्र आहेतकुणी म्हणाले, छे! खरे तर त्या शब्दांत ताकद आहे. कुणी ओरडले, हे तर साक्षात महात्मा.कुणी ओरडले, छे! उपवास करूनच सापडले परमात्मा. कुणी म्हणाले, ही भूमी आपली जननी.कुणी म्हणाले, छे! हो… खरे तर मातापित्यांच्या जावे शरणी. कुणी प्रचाराच्या बाजारात झुंजले का?कुणी भुकंपाच्या कोपात भाजले का? दहशताची ठेच कुणी ऐकली का?भुकेची तळमळ कुणी जाणली का? आणी मी…मी […]

Read More →

ओझ्याचे गाढव

अर्ज केला, मुलाखत झाली,पेढ्याची पुडी सर्वांना वाटली.ईस्त्रीचा सफेद र्शट चढवला,र्वषाचा लोकलचा पासही काढून ठेवला. चहा करा, कॉपी काढा,नोकरीसाठी तळवे घासा.होयजी साहेब, हांजी माँड्म. मोठ्या साहेबांची बडधास ठेवा,छोट्या माँड्मची मर्जी राखा.अपमान गिळा, बोलण्या खा,बड्या कंपनीचा ठसा उमटवा. सगळ्यांच्या आधी या,फायलींच्या धिगार्यात सुट्टी काढा.होयजी साहेब, हांजी माँड्म. पंचतारांकित फुकटच्या Beer मुळेचहोते सध्या काहीशी बचत.कारण ओझ्याचे गाढव म्हणे असतेInterns चे आराध्य दैवत.

Read More →

एक झाड

एक झाड असाव,खिडकीच्या बाहेर बहरणारएक झाड असाव. नारंगी शालू नेसून भर उन्हाळ्यातमिरवणाऱ्या गुलमोहोराकडेडोळे भरून नाहाळाव.पावसाळ्यात कडक चहा पितानात्याला मिसकीलपणे चिडवाव. एक झाड असाव,खिडकीच्या बाहेर,एक झाड असाव. हिरव्या-पिवळ्या काठपदराच्यासडपातळ चेरीचे पानगळतीतमन जाणून घ्याव.हिवाळ्यात जन्माजन्मांचे वादे नकोतर्वतमानात जगण्याचे धैर्य द्याव. एक झाड असाव,लेकी-नातींच्या विश्वाच्या पलीकडे,खिडकीच्या बाहेर बहरणार.

Read More →

सोहळा

हार तुरे बांधा, रांगोळया काढा,आपुल्या भेटीसाठी काहीतरी जल्लोष करावा.खूप दिवस झाले भेटून याचा आहे FB वर पुरावा,Whatsapp मुळे म्हणे कमी झाला आहे Timezoneचा दुरावा. तुझ्या घरच्यांसाठी Chocolate चा डब्बा, तुझ्या चिमुरडीसाठी खाऊ-खेळणी घेतली आहेत आवर्जून.पण तुझ्यासाठी सखे काय आणू ह्या 23kgच्या मर्यादेत बांधून?‘दिवसभर’, ‘Dinner ला’ म्हणता म्हणता भागते Coffee वरच तहान,वर्षाचे प्रगतीपुसतक मांडताना हरवून जाते भान. 3.30 च्या बसमधील गणवेषातील हसणार्या कारट्या,विशीतल्या त्या बेधूंद तरुणींच्या पारट्या.आठवणींचा पाढा म्हणताना होतो कंठ हळवा,दोन तासांच्या भेटीत साजरा होतो जीवाभावाचा सोहळा.

Read More →

Sculptures

Louvre राजवाड्यातील Monalisa लावाटत असेल का एकटेपणा?Selfies च्या ओलाव्यात एक निराळाच कोरडेपणा.चाहत्यांच्या तर्कांची वाटत असेल का गंमत?सिम्तहास्याच्या पड्याआड असेल Italian सेठाणी हळूहळू खचत. Gizaच्या Sphinx ला आला असेल का प्रचंड संताप?रणरणत्या सहारा मध्ये बसुन दाखवायचे तिने कोड्यांचे प्रताप.Pharaoh बरोबर स्वस्तातला सौदा केल्याचा वाटत असेल का खंत?विदुषीचा सन्मान सोडून स्विकारला तिने वाळवंतात द्वारपालिकेचा अंत. Copenhagen च्या Mermaid ला वाटत असेल का पोरके?समुद्रकिनारी बसूनही तिला भीक घालेना तिचे टोळके.प्रेमापोटी वाहून गेल्याने वाटत असेल का फसगत?जगावेगळे स्वप्न पाहून केली मत्स्यराणीने हिंमत. New York च्या Fearless Girl ला वाटत असेल का Peer pressure?बुरसटलेल्या परंपरांना सामोरेजाऊन गाठायचे तिला शिखर.निरागस बालिकेला वाटत असेल का हा कसौटीचा प्रवास?शेकडो वर्षानंतर वळून पाहिल्यावर जग म्हणेल पोरीने लिहीला एक अनोखा इतिहास. 23 September 2018

Read More →

Lifestyle

आम्ही Insta generationआम्हाला खाण्याचे व्यसन. पौष्टिक Salads असोत किंव्हा झणझणीत चिकन,अन्न, वस्त्र, निवारा आणि Smartphone वर Deliveroo चे बटण. मुघ्हलाई, चाईनीज, राहिले दूर,आता ताव मारण्यासाठी असते Italian, Mexican किंवा Peruvian. भाजी-भाकरी सोडून केली आम्ही Weekend brunch ची Fashion,कंटाळा आला म्हणून Midweek जातो Pizza-Pasta takeaway ला शरण. आम्ही Insta generationआम्हाला खाण्याचे व्यसन. शुक्रवार उगवताच होतो Hangout sathi search,4 तास Google करून जागा नाही मिळाली कीआम्ही म्हणतो Too much! पाडव्याला पुरणपोळी, गणपतीला मोदक खाताना Selfie is a must,मग म्हणा #ethinic #homemade लाच करा trust. वदनी कवळ घेता प्रथम Insta वर photo curry चे, असे म्हणुन गिळतो,खाण्यासाठीच जगतो आम्ही की Likes साठी मरतो. आम्ही Insta generationआम्हाला खाण्याचे व्यसन. 29 July 2018

Read More →