Lifestyle
आम्ही Insta generation
आम्हाला खाण्याचे व्यसन.
पौष्टिक Salads असोत किंव्हा झणझणीत चिकन,
अन्न, वस्त्र, निवारा आणि Smartphone वर Deliveroo चे बटण.
मुघ्हलाई, चाईनीज, राहिले दूर,
आता ताव मारण्यासाठी असते Italian, Mexican किंवा Peruvian.
भाजी-भाकरी सोडून केली आम्ही Weekend brunch ची Fashion,
कंटाळा आला म्हणून Midweek जातो Pizza-Pasta takeaway ला शरण.
आम्ही Insta generation
आम्हाला खाण्याचे व्यसन.
शुक्रवार उगवताच होतो Hangout sathi search,
4 तास Google करून जागा नाही मिळाली की
आम्ही म्हणतो Too much!
पाडव्याला पुरणपोळी, गणपतीला मोदक खाताना Selfie is a must,
मग म्हणा #ethinic #homemade लाच करा trust.
वदनी कवळ घेता प्रथम Insta वर photo curry चे, असे म्हणुन गिळतो,
खाण्यासाठीच जगतो आम्ही की Likes साठी मरतो.
आम्ही Insta generation
आम्हाला खाण्याचे व्यसन.
29 July 2018