Sculptures
Louvre राजवाड्यातील Monalisa ला
वाटत असेल का एकटेपणा?
Selfies च्या ओलाव्यात एक निराळाच कोरडेपणा.
चाहत्यांच्या तर्कांची वाटत असेल का गंमत?
सिम्तहास्याच्या पड्याआड असेल Italian सेठाणी हळूहळू खचत.
Gizaच्या Sphinx ला आला असेल का प्रचंड संताप?
रणरणत्या सहारा मध्ये बसुन दाखवायचे तिने कोड्यांचे प्रताप.
Pharaoh बरोबर स्वस्तातला सौदा केल्याचा वाटत असेल का खंत?
विदुषीचा सन्मान सोडून स्विकारला तिने वाळवंतात द्वारपालिकेचा अंत.
Copenhagen च्या Mermaid ला वाटत असेल का पोरके?
समुद्रकिनारी बसूनही तिला भीक घालेना तिचे टोळके.
प्रेमापोटी वाहून गेल्याने वाटत असेल का फसगत?
जगावेगळे स्वप्न पाहून केली मत्स्यराणीने हिंमत.
New York च्या Fearless Girl ला वाटत असेल का Peer pressure?
बुरसटलेल्या परंपरांना सामोरेजाऊन गाठायचे तिला शिखर.
निरागस बालिकेला वाटत असेल का हा कसौटीचा प्रवास?
शेकडो वर्षानंतर वळून पाहिल्यावर जग म्हणेल पोरीने लिहीला एक अनोखा इतिहास.
23 September 2018