ओझ्याचे गाढव

अर्ज केला, मुलाखत झाली,पेढ्याची पुडी सर्वांना वाटली.ईस्त्रीचा सफेद र्शट चढवला,र्वषाचा लोकलचा पासही काढून ठेवला. चहा करा, कॉपी काढा,नोकरीसाठी तळवे घासा.होयजी साहेब, हांजी माँड्म. मोठ्या साहेबांची बडधास ठेवा,छोट्या माँड्मची मर्जी राखा.अपमान गिळा, बोलण्या खा,बड्या कंपनीचा ठसा उमटवा. सगळ्यांच्या आधी या,फायलींच्या धिगार्यात सुट्टी काढा.होयजी साहेब, हांजी माँड्म. पंचतारांकित फुकटच्या Beer मुळेचहोते सध्या काहीशी बचत.कारण ओझ्याचे गाढव म्हणे असतेInterns चे आराध्य दैवत.